Bollywood Balcony EP 01 Bramhastra Movie Review
*ब्रम्हास्त्र: पार्ट 1 शिवा* गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वांना प्रतीक्षा होती तो सिनेमा अखेर प्रदर्शित झाला... सिनेमा रिलीज होण्या आधीच बॉयकोट ब्रम्हास्त्र हा ट्रेंड होत होता, असो ट्रोलर्स ना फक्त निमित्त मात्र हवं असतं, चित्रपट 3d मध्ये बघण्याची एक वेगळीच मजा आहे, काहीही लिहिण्या आधी सिनेमाच्या मेकर्स च कौतुक करावंसं वाटतं बॉलिवूड मध्ये पहिल्यांदा VFX ने परिपूर्ण असलेला हा सिनेमा आहे. सिनेमाची सुरुवात शाहरुख खान पासून होते, आणि मग खऱ्या अर्थाने आपण जातो अस्त्रांच्या दुनियेत, इथे एन्ट्री होते आपल्या हिरो ची म्हणजेच शिवा ची जे पात्र रणबीर कपूर साकारतोय हा DJ शिवा एका पार्टी मध्ये ईशा (आलिया भट्ट) ला बघतो, इथून खऱ्या अर्थाने स्टोरी सुरू होते स्टोरी सुरू होताच शाहरुख खान च्या पार्ट चा एन्ड होतो आणि आपल्याला ब्रम्हास्त्र ची ओळख व्हायला लागते मग मोनी रॉय (जोहर) ची एन्ट्री होते नागीण नंतर तिला या भूमिकेत प्रेक्षक accept करतील अशी आशा आहे, मग काही काळासाठी नागार्जुन आपल्याला बघायला मिळतात एका अस्त्राच्या भूमिकेत आता ती भूमिका कोणती आहे ते सिनेमा बघितल्यावर कळेल, पण ...