Posts

Showing posts from July, 2023

बाईपण भारी देवा - एका पुरुषाच्या नजरेतून

 एका पुरुषाच्या नजरेतून *बाईपण भारी देवा* आज वेळ काढून आईला हा सिनेमा बघण्यासाठी घेऊन गेलो होतो तेव्हा आई सांगत होती की माहेरची साडीनंतर एवढी गर्दी ही याच सिनेमाला बघायला मिळाली. अशा प्रकारे सिनेमा बघण्यासाठी बायकांची संख्या तर जास्त होतीच, पण अनेक पुरुषसुद्धा हा सिनेमा बघायला अगदी उत्सुकतेने आलेत हे बघून बरं वाटलं आणि सिनेमा बघतांना सतत वाटलं, की हा सिनेमा बायकांपेक्षा पुरुषांनी जास्त बघितला पाहिजे. म्हणजे बघा ना कळत नकळतपणे आपण आपली टेंशन्स, कामाचा ताण सगळं काही बायकांवरच लादत असतो. ही गोष्ट फार कमी पुरुष मान्य करतील. असो पण मुलगी, आई, सून, बायको आणि आजी अशी अनेक पात्र एकटी स्त्री अगदी नि:स्वार्थपणे पार पाडत असते.. आता थोडं सिनेमा विषयी बोलूयात- ट्रेलरवरून आपल्याला कळलं होतं, की ही 6 अशा बहिणींची गोष्ट आहे  ज्यांच्या मध्ये अनेक मतभेद असूनसुद्धा त्या एका मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात... पण हा भाग घ्यायच्या आधी आणि नंतर त्यांना काय काय अडचणी येतात, त्यांच्यातले मतभेत दूर होतात की नाही, हे या सिनेमात मांडलंय..  जया (उर्फ माई) म्हणजे रोहिणी हट्टंगडी, शशी म्हणजे वंदना गुप्ते, ...