Posts

Showing posts from January, 2024

हनुमान…!!

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आला तो पाहून हा सिनेमा बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली… यतो धर्मस्ततो हनुमान: यतो हनुमानस्ततो जयः हे अगदी खरं म्हंटलंय, सिनेमाची सुरवात आपल्याला माहिती असलेल्या हनुमानाच्या कथेपासून होते…की कसं इंद्र देवाच्या वज्रामुळे झालेल्या जखमेतून रक्ताचा थेंब समुद्रात पडतो आणि रुद्रमणी बनतो… यात व्हिलन असणारा मायकल म्हणजेच विनय राय याला सुपरहिरो व्हायचं असतं, पण तो सुपर व्हिलन बनतो. सुपर हिरोच्या कथा त्याच्या इतक्या इम्पॅक्ट करतात की तो स्वतःला प्रत्येक सुपरहिरो पेक्षा जास्त शक्तिशाली समजतो… त्याच्या जोडीला त्याचा सायंटिस्ट मित्र असतो जो त्याला सर्व शक्तिशाली सुट बनवून देतो….. हे झालं व्हिलन बद्दल आता बोलुयात आपल्या हिरोविषयी म्हणजेच हनुमंताविषयी. तेजा सज्जा याने हनुमंत हे कॅरेक्टर अगदी परखडपणे स्वतःमध्ये रुजवलय…. छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा हनुमंत मीनाक्षीवर म्हणजेच अमृता अय्यरवर प्रेम करत असतो…. अंजेनाद्री गावाची ही गोष्ट जिथे हनुमंत आणि त्याची बहीण अंजाम्मा राहत असते….पॉलिगार म्हणजे सावकार पद्धत गावात राबवणारा गजपती डाकू पाठवून गावाकडे येणाऱ्या बसवर हल्ला ...